मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर बिनविरोध

स्वीकृत नगरसेवक पदी महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर यांची निवड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी अधिकृत घोषणा केली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर (शिंदे शिवसेना) आणि मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर (भाजप) यांची नियुक्ती जाहीर झाली.

पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठी पाटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. यावेळी शिंदे शिवसेना व भाजपचे नगरसेवक महायुती म्हणून एकत्र आल्याचे चित्र दिसले असून भविष्यात पालिकेचा कारभार महायुतीतून चालण्याचे संकेत मिळाले आहेत.

सभेदरम्यान कचरा व्यवस्थापन, प्रलंबित विकासकामे, ऑनलाइन कामकाज व माहिती उपलब्धतेबाबत नगरसेवकांनी मुद्दे उपस्थित केले. निवडीनंतर विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाटकर यांचे अभिनंदन केले. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन नगराध्यक्षा वराडकर यांनी केले, तर प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे उपनगराध्यक्ष पाटकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!