भिरवंडे वासियांचे आशीर्वाद गोटया सावंत यांच्या पाठीशी

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणूक साठी हरकुळ बुद्रुक जि प मतदार संघ ची उमेदवारी माजी जि प अध्यक्ष भिरवंडे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोटया सावंत यांना मिळावी त्यांच्या पाठीशी गाव म्हणून ठाम पणे उभे राहणार असल्याचा निर्धार भिरवंडे गावातील महिला, युवक, व जेष्ठ ग्रामस्थांनी केला आहे
भिरवंडे गावातील ग्रामस्थांची बैठक रविवारी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या भिरवंडे येथील निवासस्थानी पार पडली यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना संदेश सावंत पहिल्यांदाच आपल्या गावातून निवडणूक लढवणार आहेत यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात इतर भागातून निवडून येत होते परंतु काही राजकीय परिस्थिती मुळे त्यांना आपल्या गावातून निवडणूक लढवायला मिळत नव्हती

या बैठकीत संदेश उर्फ गोटया सावंत यांनी आपली गावातून निवडणूक लढवण्याची भूमिका ग्रामस्थ समोर मांडली त्याला सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक मतधिक्याने निवडून देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला

error: Content is protected !!