आचरा हिर्लेवाडी येथे माघी गणेश जयंती

आचरा (विवेक परब) : आचरा हिर्लेवाडी येथील माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे गणेश जयंती उत्सवानिमित्त पंढरीनाथ मंदिर येथे २२ ते २६ जानेवारी या कालावधीमध्ये गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ‘यानिमित्त गुरुवार, २२ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्रींची प्रतिष्ठापना, विधीवत पूजन, आरती, दुपारी महाप्रसाद, रात्री १० वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, २३ रोजी दुपारी महाप्रसाद, रात्री १० वाजता पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग, शनिवार, २४ रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, रात्री श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ, मालवण गवंडीवाडी यांचा ‘शेजारी पडलो आजारी’ हा दोन अंकी नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार, २५ रोजी रात्री ९ वाजता देखावायुक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धा होणार आहे. सोमवार, २६ रोजी दुपारी ४ वाजता मिरवणुकीने श्रींचे विसर्जन होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष लवू मालंडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!