युवासेना तालुका चषक दारिस्ते–कणकवली स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : युवासेना तालुका चषक दारिस्ते–कणकवली या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांतजी नाईक आणि युवासेना तालुका कणकवली प्रमुख तथा एस.टी. कामगारसेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख अविनाश गावकर, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर उपस्थित होते. तसेच लवू पवार, श्रीराम गुरव, दारिस्ते गावचे मानकरी बाळू गावकर, संदीप गावकर, ओमकार गावकर, आर्यन गावकर, प्रतीक गावकर, सहदेव गावकर, हरेश तांबे, रितेश ठाकूर, अमित सावंत, बापू तावडे, प्रथमेश सावंत, शिवप्रसाद गावकर, पंढरी तांबे, गणेश गुरव, सुरज गुरव, वैभव गुरव, वैभव मेस्त्री, सूरज देवळी यांच्यासह अनेक शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांना क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

error: Content is protected !!