वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री सिमेंट व बांगर सिमेंट कंपनीच्या नवीन गोडाऊनचा उद्घाटन समारंभ नुकताच घंगाळेवाडी कोकिसरे येथे भवानी ट्रान्सपोर्ट कंपनी व भैरी भवानी उद्योग समूह येथे संपन्न झाला. श्री सिमेंटची जिल्ह्याचे प्रमुख वितरक म्हणून भैरी भवानी उद्योग समूहाला एजन्सी मिळाली आहे. यावेळी श्री सिमेंटचे विभागीय प्रमुख दीपक शिंदे, ऑफिसर गुरुनाथ लोके, भैरी भवानी उद्योग समूहाचे प्रमुख गिरीधर रावराणे, अतुल रावराणे, सुनील रावराणे, देवानंद पालांडे यांच्यासह वैभववाडी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी ठेकेदार उद्योजक उपस्थित होते.
घंगाळेवाडी कोकिसरे येथे श्री सिमेंटच्या नवीन गोडाऊनचे उद्घाटन












