मनसे च्या शांताराम सादये आणि ठाकरे सेनेच्या सुधीर सावंत यांची माघार
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पं स चे एकूण तीन उमेदवार बिनविरोध
कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे पंचायत समिती मधील भाजपाचे उमेदवार राजेश उर्फ सोनू सावंत यांची पंचायत समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी उमेदवार ठाकरे सेनेचे सुधीर सावंत आणि मनसे चे शांताराम सादये यांनी आपले नामनिर्देशन आज मागे घेतले. त्यामुळे सोनू सावंत यांच्या विरोधात पं स निवडणूकीत उमेदवारच शिल्लक राहिला नाही. साहजिकच सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली असून अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचेएकूण 3 पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आले असून 24 आणि 27 जानेवारी ह्या दोन दिवसांत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. त्यामुळे भाजपाच्या बिनविरोध सदस्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.












