ग्रा. पं. सदस्यांसह माजी शाखाप्रमुख भाजपात

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पं. स. निवडणूक मतदान तोंडावर असतानाच वागदे गावात ठाकरे सेनेला पालकमंत्री नितेश राणेंनी धक्का दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वागदे गावातील ग्रामपंचायत सदस्य दशरथ गावडे, माजी शाखाप्रमुख रवी गावडे यांच्यासह संतोष घाडीगांवकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, बालकृष्ण उर्फ़ राजू गावडे आदींनी ओम गणेश बंगल्यावर ठाकरे सेनेची मशाल सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. पालकमंत्र्यांच्या विकासाकामांची झंझावाती कार्यशैलीने प्रभावित होऊन आमच्या गावाच्या विकासकामांसाठी भाजपात पक्षप्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
या पक्ष प्रवेशामुळे कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात आणि ओसरगाव पं. स. मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठा फटका बसणार आहे. पक्षप्रवेशावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगांवकर, समीर प्रभुगावकर, गोविंद घाडीगावकर आदी उपस्थित होते.













