आचिर्णेत आरोग्य तपासणी शिबिरात ११२ जणांची तपासणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : माझगाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत आचिर्णे येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपकेंद्र आचिर्णे व ग्रामपंचायत आचिर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर रोजी आयोजित या शिबिरात एकूण ११२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये महिला तसेच विद्यार्थ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता.

शिबिरात ३२ जणांचे ईसीजी, ७५ जणांचे एक्स-रे, ५१ जणांच्या रक्त तपासण्या आणि ६० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच ७८ महिलांची आणि ९३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांचे प्राथमिक निदान करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरासाठी पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे, आचिर्णेचे सरपंच वासुदेव रावराणे,वैधकीय अधिकारी डॉ अनिल पवार, तालुका आरोग्य सहाय्यक आनंद चव्हाण, आरोग्य सेवक सम्राट मरगाळे, आरोग्य सेविका सेजल कुवळेकर, सांगुळवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम डॉ. देसाई, डॉ. गायकवाड, डॉ मुद्राळे, नेत्र चिकित्सा अधिकारी देवयानी देसाई, वरिष्ठ उपचार पर्यावेक्षक सुहास कांबळे,वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!