खारेपाटण (प्रतिनिधी) : “आपला गाव आरोग्य संपन्न गाव “या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेश भक्त व
चाकरमान्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या आरोग्याच्या देखभाली दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
आज गुरुवार दि.१० सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य पथकाला खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव, यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बूथ अध्यक्ष श्री विजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.तर खारेपाटण प्रा.आ.केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री भागवत,श्री तेली, श्रीम.करोड याबरोबर खारेपाटण पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल सुनील निकम आदी कर्मचारी उपस्थित होते.
खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या
वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण चेक पोस्ट येथे तैनात करण्यात आलेले हे आरोग्य पथक दि.१० सप्टेंबर २०२६ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत स.८.०० ते दु.२.०० व दु.२.०० ते रा.८.०० या वेळेत दोन पाळीत कार्यरत राहणार आहे.या आरोग्य पथकात खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार आहेत.











