माजी विद्यार्थी प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्याकडून खर्डेकर महाविद्यालयाला जेईई, नीटची पुस्तके भेट

विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला मिळणार मोठी मदत

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला चे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली. या उपक्रमामुळे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध होणार आहे.

स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने देसाई यांनी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करावे, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी व्यक्त केली.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केलेले हे योगदान प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ धनराज गोस्वामी यांनी नमूद केले.

यावेळी प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, ग्रंथपाल शुभदा माने, डॉ. सचिन परूळकर, डॉ .मनिषा मजुमदार,डॉ. सुनील भिसे, डॉ. कलमेश कांबळे, डॉ. संदीप वर्पे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रसन्ना देसाई यांच्या उपक्रमाचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!