शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका वंदना शितोळे यांचा इनरव्हील क्लब वेंगुर्ले तर्फे सन्मान

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लातर्फे शिक्षिका वंदना शितोळे यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचे मोलाचे योगदान असते. शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लातर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वंदना शितोळे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला क्लब अध्यक्ष ज्योती देसाई, उपाध्यक्ष सई चव्हाण, ट्रेझरर वृंदा गवंडळकर, ई.सी. मेंबर अफशान कौरी आणि रसिका मठकर उपस्थित होत्या. इनरव्हील क्लबच्या या उपक्रमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

error: Content is protected !!