बिनविरोध जि. प. सदस्य निवडीतून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून खारेपाटण तालुका निर्मितीला मिळेल गती

सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून द्या, खारेपाटण नूतन तालुका निर्मितीचे स्वप्न मी पूर्ण करतो असा शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. त्यानुसार खारेपाटण जिल्हा परिषद सदस्यपदी भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवार प्राची इस्वलकर यांना बिनविरोध निवडून दिले आहे. आता खारेपाटण तालुका निर्मितीला गती येईल असा विश्वास वाटत असल्याचे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक रुपेश सावंत यांनी म्हटले आहे.

खारेपाटण जिल्हा परिषद सदस्यपदी भाजपा शिवसेना युतीच्या प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राची इस्वलकर यांच्या बिनविरोध निवडीसाठी भाजपा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचेही योगदान आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मनोगतात खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून द्या, मी खारेपाटण तालुका निर्मितीसाठी सक्रिय सहकार्य करतो अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे आता खारेपाटण तालुका निर्मितीला गती मिळेल असा विश्वास खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक रुपेश सावंत यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!