फोंडाघाट ग्रामपंचायत जवळचा ब्रिटिश कालीन ब्रिजला अखेरचा निरोप! २६ जानेवारीच्या मुहूर्तावर ब्रिज पाडण्यास सुरुवात

आज पासून अवजड वाहनांची वाहतूक हरकुळ-कनेडी-कणकवली मार्गे

फक्त एसटी, दुचाकी, पर्यटकांची चारचाकी वाहने इत्यादी वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू

पालकमंत्र्यांनी, कार्यकारी अभियंता यांना अवजड वाहने वगळता सर्व एस. टी. व चारचाकी वाहतूक कायम सुरू ठेवण्याचे आदेश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अखेर ठेकेदार यांनी ग्रामपंचायत जवळचे ब्रिटिश कालीन ब्रिज तारीख २६ जानेवारी रोजी पाडण्यास सुरुवात होणार आहे, असे सांगितले. आज दुतर्फा फलक लावून वाहन चालकांना बांधकाम विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहने, चिरा-वाळू-ट्रक, कंटेनर, ट्रॉलर इत्यादी हरकुळ-कनेडी-कणकवली मार्गे वळविण्यात आली आहेत. तर दुचाकी पर्यटकांच्या चारचाकी आणि एस. टी. वाहतूक, पर्यायी सुरक्षित सक्षम मार्गावरून सुरू राहणार आहे.

याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिक्षक यांना समक्ष बोलवुन ब्रिज पाडले तरी कोणत्याही परिस्थितीत एस. टी. आणि दुचाकी पर्यटकांच्या चारचाकी कायम सुरू ठेवा. कुणालाही त्रास देऊ नका. याबाबत संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून त्वरित कार्यवाही करा, असे आदेश दिले आहेत. याबद्दल फोंडावासीयांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

एस. टी. बंद झाल्याने फोंडाघाट मधील सजग ग्रामस्थ सुरेश टक्के, सुहास मोदी अनेक अनेकांनी २६ जानेवारीला उपोषणाची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करताना एस. टी. गाड्या कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सुद्धा विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, व्यापारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्या चालू ठेवण्यास आणि स्थानिक प्रशासनाला अधिकार देऊन गाड्या कायम चालू ठेवाव्यात असे आदेश पत्र क्रमांक ०१/२०२६ द्वारे दिला आहे. त्यामुळे बांधकाम विभाग, एस. टी. प्रशासन जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून स्थानिक पातळीवर, तातडीने, एस. टी. व इतर लाईट गाड्या तपासणी केलेल्या सुरक्षित पर्यायी मार्गाने कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात, अशी आग्रही मागणी फोंडावासीयांनी केली आहे.

error: Content is protected !!