आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचा मानबिंदू किल्ले भगवंतगड येथे आज ७७ वा प्रजासत्ताक दिन शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रभक्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य केदार परूळेकर यांच्या हस्ते किल्ल्यावर प्रथमच ध्वजवंदन करण्यात आले. उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी ग्रामवासियांना शुभेच्छा देत कर्तव्य भावना, संविधानिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी उपसरपंच दिपक सुर्वे, बाबा मेस्त्री, रविंद्र गोसावी, देवेंद्र हडकर, सचिन आचरेकर, मंगेश नाटेकर, विवेक परब, विश्राम माळगांवकर, तुषार पवार, समिर अपराज, रणजित दत्तदास, सदानंद गोसावी, रोशनी फर्नांडिस, दिनेश पाताडे, मयुरेश माडये, रोहित पाटील, समिर अपराज, द्रोण जाधव, विशाल भोगले, अनिकेत भोगले, सोहम भोगले, विनेक भोगले, रविंद्र भाटकर, आकांक्षा परब, शुभांगी भोगले आदी उपस्थित होते.












