वैशिष्ट्यपूर्ण वारसा लाभलेल्या,फोंडाघाट एसटी स्थानकावर, प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन उत्साहात !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी फोंडाघाट एसटी स्थानकावर स्थानक प्रमुख राठोड आणि पवार यांचे उपस्थिती ध्वजवंदन उत्साहात पार पडले. स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागातील फोंडाघाट एसटी स्थानकाला, स्थानक प्रमुख, रिक्षा,सहा सीटर चालक, प्रवासी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमेव ध्वजवंदनाचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा लाभला आहे. यावेळी फोंडा माळवाडी,- हवेलीनगर शाळेतील मुले- मुली प्रभातफेरी ने सहभागी झाली. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत झाले.

यावेळी पियुष सापळे कु.नजराणा मुजावर यांनी देशभक्तीपर आपले विचार मांडले. त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. या सोहळ्याला माळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद तसेच शि.पा संघाचे अध्यक्ष, खाचणेसर, सुषमा लाड, एसटी चालक – वाहक आणि प्रवासी- ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर सर्व मुले गावाच्या सामुदायिक ध्वजवंदनासाठी मार्गस्थ झाली.

error: Content is protected !!