प्रगती महिला मंडळ वायंगणीचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात..!

शेती तज्ञ मंदार केळकर यांचे विशेष मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : प्रगती महिला मंडळ वायंगणीचा हळदीकुंकू समारंभ ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ या मंडळा द्वारे महिला प्रबोधनाचा वसा अविरत सुरू असून मार्गदर्शन शिबिरे आरोग्य शिबिरे या सारखे विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी शेती तज्ञ, शेती विषयक सल्लागार, आंबा बागायत टेक्निकल ॲडव्हाजर मंदार केळकर यांचे महिलांना विशेष मार्गदर्शन लाभले. केळकर यांनी शेती का करावी, युवावर्गाने शेती कडे का वळावे, शेती पुरक व्यवसाय या बाबत प्रबोधनात्मक विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिक्षा दिपक सुर्वे यांनी भूषविले.

यावेळी ग्रामसंघच्या मंजिरी राणे, अनुपमा आसोलकर, आदी शंभर पेक्षा जास्त महिलावर्ग उपस्थित होत्या‌. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार उपसरपंच समृध्दी आसोलकर यांनी मानले.

error: Content is protected !!