७ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सप्टेंबर महिन्यातील लोकशाही दिन महिन्याच्या पहिला सोमवार दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे राबविण्यात येणार आहे. तसेच या लोकशाही दिनात नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार असून, मागील लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित विभागांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसिलदार प्रदिप पवार यांनी दिली आहे.
00000

error: Content is protected !!