विद्यार्थ्यांच्या आनंदात रमल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

शिक्षक दिनानिमित्त आडाळी शाळेत तृप्ती धोडमिसे यांचा विद्यार्थ्यांशी अनोखा संवाद

दोडामार्ग (प्रतिनिधी) : ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, आडाळी येथे विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.मुलांचा अभ्यास, त्यांची गुणवत्ता, विविध कौशल्ये आणि कलागुण यांचे कौतुक करताना जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अगदी मिसळून त्यांच्यासोबत नृत्यही केले!

मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नव्हे, तर संस्कार, मूल्ये आणि सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारे सकारात्मक ऊर्जेचे मर्मस्थान आहे, हा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या आनंदात सहभागी होत आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी कृतीने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिन खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.

दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!