खारेपाटण येथील पारंपरिक दहीकाला उत्सव आनंदाने साजरा

बालगोपाल यांनी बांधलेल्या विविध दहीहंड्या व दिंडी ठरल्या आकर्षण

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण येथील दहीकाला उस्तव हा पारंपरिक व ऐतिहासिक दहीकाला म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असून शनिवारी सकाळ पासूनच खारेपाटण शहरात विविध ठिकाणी दहीकाला उत्सवाला गोविंदा रे गोपाळा च्या जय घोषणे सुरवात झाली.सायंकाळी खारेपाटण मात्र सार्वजनिक दहीकाला उत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली.या निमित्ताने काढण्यात आलेली दिंडी व विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या उंच उंच दहीहंड्या सर्वांचे आकर्षण ठरले. खारेपाटण येथील दहीकाला उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी दशक्रोषातील नागरिक सकाळपासूनच खारेपाटण येथे गर्दी करतात.यावेळी खारेपाटण बंदरगाव येथील आदिनाथ मित्र मंडळाची गोपाल काला दिंडी घेऊन खारेपाटण बाजारपेठेत दाखल झाला.यानंतर खारेपाटण गावाचा दहीकाला उस्तव सायंकाळी साजरा करण्यात आला.यामध्ये श्रीकृष्ण राधा यांची पौराणिक पात्रे सादर करणारे देखावा सजवलेल्या दिंडीत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत दाखल झाले. यावेळी गोपीकांचा सुंदर नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. खारेपाटण येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथून सुरवात झालेल्या दहीकाला उत्सवाला खारेपाटण एस टी बावस्थानक मार्गे खारेपाटण बाजारपेठ येथून थेट घोडे पाथर बंदर पर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नेण्यात आला.यावेळी खारेपाटण बस स्थानक येथे बांधण्यात आलेली दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली.खारेपाटण युवकांनी ही दहीहंडी उंच मनोरे लावून ती फोडली.ही दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी खारेपाटण एस टी बस स्थानकावर जमलेली होती. यावेळी खारेपाटण तालुका झालाच पाहिजे … ! अशा जोरदार घोषणा खारेपाटण येथील दहीकाला उत्सवात जमलेल्या युवक व नागरिकांनी दिल्या.
या सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्ताने खारेपाटण येथील सुमारे एक हजारा पेक्षा अधिक नागरिक मोठ्या उस्ताहाने एकत्र येऊन हा दहीकाल उत्सव साजरा करून एकात्मतेचे दर्शन घडवत असतात.यामध्ये खारेपाटण मधील युवक युवती महिला पुरुष जेष्ठ नागरिक यांचा मोठा सहभाग असतो.या कार्यक्रमाला खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे प्रमुख मिलिंद देसाई,पोलिस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

error: Content is protected !!