माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचा उपक्रम
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथे वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यालय कट्टा यांच्यावतीने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत परिसर व शेजारील रस्ता येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच शेखर पेणकर, ग्रामपंचायत अधिकारी सुदाम चौरे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत टेंबुलकर, स्वातंत्र्य सैनिक विद्याधर रेवणकर, अनिल ढोलम, सफाई कामगार रविंद्र कांबळे, शिपाई संकेत परुळेकर,श्रीकांत भोजणे, सोनाली भोजणे उपस्थित होते.









