कुरंगवणे बेर्ले गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री संजय मांजरेकर यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवने – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या नागरिकांची ग्रामसभा नुकतीच दि.२ सप्टेंबर २०२६ रोजी गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली.या सभेमध्ये गावचे रहिवासी संजय विठ्ठल मांजरेकर यांची गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच पप्पु ब्रम्हदंडे,उपसरपंच बाबला गोसावी,सदस्य बबलू पवार,सौ विशाखा राऊत,रवींद्र पवार,स्नेहा गोसावी,सारीका कुडाळकर, अक्षदा सादीकले,सचिव श्री गर्जे, माजी सरपंच बाळा राऊत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र लाड,सोसायटीचे व्हाइस चेअरमन रवींद्र लाड,संजय लाड,महावीर गोसावी,शिवाजी गाडे,बाबु गोठणकर,नारायण कदम,अरुणा ब्रम्हदंडे,पोलीस पाटील देवेन गोसावी,बेर्ले पोलिस पाटील रतन राऊत आशा सेविका वैष्णवी पवार,सिआरपी सोनाली पवार, दिप्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गावचे नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय मांजरेकर यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.श्री मांजरेकर यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!