लोरेत जि प उमेदवार अनंत पिळणकर यांचा झंझावाती प्रचार

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडा जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समितीमध्ये श्री गांगोलोरे चाळा येथे फोंडा जिल्हा परिषद चे उमेदवार अनंत गंगाराम पिळणकर व लोरे पंचायत समितीच्या उमेदवार कीर्ती कृष्णा एकावडे यांचा लोरे गांगोचाळा मंदिर मध्ये दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला.

यावेळी उपस्थित  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फोंडा  विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार, गौरव एकावडे, तनया तोरस्कर, स्वाती घाडी, दर्शन मराठे, विशाल राणे, संतोष चव्हाण, रामदास पाटकर, अमित लाड, इत्यादी.

error: Content is protected !!