११ आणि १३ सप्टेंबरला सुटणार मोदी एक्सप्रेस
मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तांच्या आग्रहास्तव ‘मोदी एक्सप्रेस’च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या वतीने मागील १४ वर्षे गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणारी ही विशेष ट्रेन आता ११ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मोदी एक्सप्रेस ही ट्रेन ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सुटणार आहे.
हजारो चाकरमानी गणेशभक्तांनी ९ आणि ११ सप्टेंबर रोजीऐवजी बदल करून नव्या तारखा घोषित कराव्यात, अशी विनंती मंत्री नितेश राणेंकडे केली होती. लोकांच्या याच भावनेचा व आग्रहाचा मान ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेश भक्तांना भजने आणि उत्साहाच्या वातावरणात कोकणात आपल्या गावी जाता यावे, यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
प्रवाशांनी तिकीट बुकिंगसाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक मंडळ अध्यक्षांशी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.










