२५ ते ३० वर्षे सुरू असलेली एसटी बस फेरी बंद करण्याचा एसटी प्रशासनाचा डाव
लोकप्रतिनिधी तातडीने लक्ष देतील काय?
आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ आगारातून संध्याकाळी ५ वाजता सुटून कणकवली, त्रिंबक, चिंदर, आचरा येथे संध्याकाळी ७ वा व नंतर देवगडला वस्तीला असणारी व सकाळी ८.३० वाजता आचरा येथून सुटून चिंदर, त्रिंबक, कणकवली येथून दुपारी कुडाळ आगार येथे पोहोचणारी एसटी बस गेले अनेक दिवस बंद आहे. दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जवळ आली आहे. अशा स्थितीत एस् टी बंद असल्यामुळे विद्यार्थी, प्रवासी, चाकरमानी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी एसटी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही एसटी प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून आगार व्यवस्थापक, आगार प्रमुख मुजोरी गिरी करत आहेत. गेली २५ ते ३० वर्षे हि बस फेरी सुरू असून ती बंद करण्याचा डाव कुडाळ एसटी प्रशासन खेळत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? असा प्रश्न विद्यार्थी, प्रवाशांन कडून उपस्थित केला जात आहे.












