श्री देव आदिनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वायंगणी या गावातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव आदिनाथ या देवाचा ३४ वा वर्धापन आज शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स. ६ ते ७ श्री गंगेश्वर मंदिर येथे सत्यनारायणाची महापूजा, स. ७ ते ८ श्री आदिनाथ मंदिर येथे अभिषेक, स. ८ ते ९ श्री देव आदिनाथ मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा, स. ९ ते १० श्री देव गंगेश्वर गुंजवणे व श्री देव निनादेवी शेजवली पालख्यांचे आगमन, १० ते १२ नवस बोलणे, ओटी भरणे, नवस फेडणे, दु. १२ ते ३ महाप्रसाद, दु. ३ ते ५ श्री ची पालखी मिरवणूक श्री देव गागेश्वर, गुंजवणे, निनादेवी, शेजवली रात्री ८ ते १० श्री देव आदिनाथ पालखी प्रदक्षिणा होणार आहे.
तर ते रात्री ठीक १० वाजता बुवा कुमार सूरज खांडेकर, पोंभुर्ले-देऊळवाडी विरुद्ध बुवा हृतिक रवींद्र गांगण, कुणकवण बंदरवाडी यांचा २०/२० भजनांचा जंगी डबलबारी सामना होणार असून या संपूर्ण कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव आदिनाथ आणि श्री देव गंगेश्वर मंदिर ट्रस्ट वायंगणी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.












