कोकणच्या आंबा काजू प्रश्नावर शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम सुरू : बागायतदार आशादायी!

चालू वर्षी निसर्गाच्या आसमानी संकटांनी बागायतदार उध्वस्त !

सन २०२४/२५ च्या विमा नुकसान भरपाईचा दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेली दोन-तीन वर्षे कोकणातील आंबा- काजू बागायतदार,शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे, थ्रिप्स- तुडतुडे रोगामुळे, हवालदिल झाला असताना, चालू वर्षी वातावरणात सातत्याने होणारा बदल, मोहरावरील औषधांना न जुमानणारे रोग आणि कीटक तसेच पडलेली खार यामुळे पुरता उध्वस्त झाला आहे. कर्ज काढून हजारो रुपयांच्या किमतीची औषधे, कामगार खर्च यामुळे फवारण्या करूनही तसेच थपथप गळणाऱ्या खारी रोगामुळे, झाडांची पाने, मोहर फुले, झाडाखालील पाचोळा जळून खाक झाला आहे.मोहर सुद्धा जळून गेला आहे

फेब्रुवारी संपत आला तरीही, झाडावर कणी पडलेली नाही. त्यामुळे सर्व उपाय करून सुद्धा, कोकणातील शेतकरी हतबल झाला असून, केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून आहे..

ऑक्टोबर मध्ये विमा कंपनीने विम्याची अत्यल्प नुकसान भरपाई खात्यावर जमा करताना, पालकमंत्र्यांनी दिवाळीनंतर दुसरा हप्ता जमा होईल असे सांगितले होते. ही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. मिळालेली रक्कम कलमांची साफसफाई, खते खरेदी, मशागत खर्च यासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी वापरला.पुढील साफसफाई औषध फवारणी इत्यादीसाठी पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा सन २४/२५ चा विमा नुकसान भरपाई अनुदानाचे वितरण तातडीने करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी विमा कंपन्यांना द्यावी आणि या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी बागायतदार, शेतकरी यांना बळ व दिलासा द्यावा अशी अपेक्षा व आग्रही मागणी होत आहे….

error: Content is protected !!