संत साहित्यिक अॅड. देवदत्त परुळेकर यांना यंदाचा प्र. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार

बांदा (प्रतिनिधी) : नट वाचनालय, बांदा यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘प्र. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार’ यंदा वेंगुर्ले येथील प्रसिद्ध संत साहित्यिक तथा लेखक अॅड. देवदत्त परुळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी विशेष समारंभात वाचनालयच्या सभागृहात दुपारी ४ वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

अॅड. परुळेकर यांनी संत साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांनी ओवी, अभंग, संतकाव्य, भक्तीपर लेखन तसेच विविध माध्यमातून साहित्यसेवा सातत्याने सुरू ठेवली आहे. त्यांच्या लेखनातून अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचा ठसा ठळकपणे जाणवतो. दैनिकांमधील लेखमालिका, साहित्यिक सदरे तसेच युट्युब माध्यमातून सादर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे त्यांनी संत साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य केले आहे.

परुळेकर हे विविध सामाजिक-साहित्यिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक व्याख्याने, प्रवचने व कीर्तने सादर केली आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत नट वाचनालयने यंदाचा पुरस्कार त्यांना जाहीर केल्याची माहिती कार्यकारी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी, मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही वाचनालयच्या वतीने करण्यात आले

error: Content is protected !!