कै.शिला शंतनु बांदिवडेकर स्मृतीदिनानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर

१४ फेब्रुवारी रोजी गडमठ गावठणवाडी येथे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कै. सौ. शिला शंतनु बांदिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार संरक्षण संघटना कोकण विभाग-सिंधुदुर्ग) आणि एकदंत फुड ॲन्ड बेव्हरेजीस (ऑरबेलो), सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान -वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गडमठ गावठणवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या मोफत आरोग्य शिबीरामध्ये फ्रैक्चर, सांधे दुखी, पाठदुखी, तज्ज्ञ व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया आदींची तपासणी डॉ. धनजय रासम, M.B.B.S,D.N.B (ऑर्थोपेडिक्स) हे करणार आहेत. तसेच दंतरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल राणे, B.D.S. दातांची तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर मोफत हिमोग्लोबीन तपासणी देखील केली जाणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता- सौरभ अण्णासाहेब माळी, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, वैभववाडी पंचायत समितीचे माजी सभापती बाप्पी मांजरेकर, गडमठ गावच्या सरपंच सौ. मालती शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच यावेळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या सावंतवाडी तालुका कार्याध्यक्षा सौ.मोहिनी मडगांवकर आणि सावंतवाडी तालुका उपाध्यक्षा सौ. शर्वरी धारगळकर या दोघीजणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वा. भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गावठणवाडी, गडमठ, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग 9049341282/9930599354/9146288188 या वरील मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा. तरी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!