बांदा दैवज्ञ समाजाचे कार्य स्तुत्य – डॉ. विवेक रायकर

संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा दैवज्ञ समाजातर्फे दरवर्षी शिरोमणी नरहरी सोनार आणि समाज श्रेष्ठी नाना शंकरशेट यांच्या कार्याचे आवर्जून स्मरण केले जाते हे कौतुकास्पद आहे. नाना शंकरशेट यांनी समाजासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्याची समाज तसेच शासकीय स्तरावर व्यापक दखल घेणे गरजेचे आहे. याठिकाणी दैवज्ञ भवन तथा दैवज्ञ पतपेढी झाली पाहिजे. बांद्यातील दैवज्ञ समाजाची एकजुट आणि कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन दैवज्ञ समाजोन्नती परिषद मुंबई विश्वस्त तथा मालवण दैवज्ञ हितवर्धक समाज अध्यक्ष डॉ. विवेक रायकर यांनी बांदा येथे केले. बांदा दैवज्ञ ब्राह्मण समाज बांधव आयोजित संत नरहरी सोनार पुण्यतिथी आणि समाजश्रेष्ठी नाना शंकरशेट स्मृती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

बांदा विविध कार्यकारी सोसायटीच्या आळवणी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांदा दैवज्ञ समाज अध्यक्ष संतोष चिंदरकर हे होते. यावेळी व्यासपीठावर, मालवण दैवज्ञ समाज सेक्रेटरी गणेश प्रभुलकर, श्रीकृष्ण शिरोडकर, बांदा उपसरपंच आबा धारगळकर, ज्येष्ठ सुवर्णकार रविंद्र मालवणकर, सोनुनाथ उर्फ अण्णा धारगळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. विवेक रायकर, गणेश प्रभुलकर, राजाराम धारगळकर, श्रीकृष्ण शिरोडकर, प्रीतम पणदूरकर, एकता मालवणकर, गुरुप्रसाद धारगळकर, चिन्मय चिंदरकर, हर्ष चिंदरकर, श्रावणी धारगळकर, मंगलदास साळगावकर, तन्वी धारगळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात दैवज्ञ समाजातील विविध मान्यवरांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात संतोष चिंदरकर यांनी आपल्या सर्व सुवर्णकार समाज बांधवांना सोबत घेऊन समाज विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच संत नरहरी सोनार व समाजश्रेष्ठी नाना शंकरशेट यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत मालवणकर यांनी तर आभारप्रदर्शन अण्णा धारगळकर यांनी केले. या सोहळ्याला उपाध्यक्ष प्रशांत चिंदरकर, सेक्रेटरी प्रसाद चिंदरकर, आपा चिंदरकर, साईनाथ धारगळकर, ओंकार मालवणकर, साईप्रसाद मालवणकर, सुरेश चिंदरकर, उमेश चिंदरकर, किशोर साळगावकर, साईराज साळगावकर, अभि धारगळकर, दादा धारगळकर, प्रथमेश मालवणकर यांचेसह अनेक सुवर्णकार तसेच महीला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!