बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री रामदास नवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची नित्यपुजा होऊन श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दुपारी राम नामाचे सामूहिक नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून महाआरती झाली व महाप्रसादास आरंभ झाला. ठिक ७ वाजता मंदिरात नित्य सायं. आरती झाली. त्यानंतर स्थानिक भजनसेवेकऱ्यांची भजन सेवा झाली. या सोहळ्यानिमित्त शेकडो भाविकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.
बांदा श्री विठ्ठल मंदिरात रामदास नवमी सोहळा उत्साहात












