जैतापूर प्रकल्प न होण्यासाठी ठाकरेंचा 500 कोटींचा व्यवहार

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

ब्युरो न्युज: कोकणामध्ये जैतापूर प्रकल्प होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंसोबत ५०० कोटींचा व्यवहार झाला होता असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. तर दुसरीकडे बारसू प्रकरणा वरूनही ठाकरेंना आव्हान दिलाय. उद्धव ठाकरेंनी कोकण येण्याची तारीख जाहीर करावी मग आम्ही पण तिकडे येतो असं आव्हान राणेंनी दिलय. जैतापूरचा प्रकल्प होऊ देऊ नका म्हणून कोळश्यावर उद्योग करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देतो असे ही राणे बोलताना म्हणाले.

error: Content is protected !!