परफेक्ट अकॅडेमीच्या श्रेयस बिलेचा जेईई मेन परीक्षेत डंका

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जेईई व नीट परीक्षेच्या सुयोग्य तयारीसाठी संपूर्ण कोकणातील अग्रगण्य असलेल्या परफेक्ट अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. परफेक्ट अकॅडेमीच्या श्रेयस लाडशेट बिले या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत ९५.५४ असे पर्सेंटाइल गुण घेऊन, उत्तुंग यश मिळवले आहे.. त्याबद्दल त्याचे आणि त्याच्या समस्त कुटुंबीयांचे सर्व स्तरावरून हार्दिक अभिनंदन होत आहे. श्रेयश हा रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांचा सुपुत्र असून रत्नागिरीहून खास आपले काका ॲड. राजीव बिले यांच्याकडे आला असता त्याला परफेक्ट अकॅडेमीबद्दल माहिती मिळाली. त्याने आपल्या परीक्षेतील महत्त्वाचे व शेवटचे परफेक्ट अकॅडेमी येथे तयारी केली. श्रेयशच्या या उज्वल यशाबद्दल परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब व टीम परफेक्ट अकॅडमीने समाधान व्यक्त केले असून श्रेयसचे विशेष अभिनंदन केले आहे. “श्रेयसने जेईई मेन परीक्षेत मिळवलेले यश हे अत्यंत स्पृहणीय असून अशीच कामगिरी इतरही विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. आमच्या परफेक्ट अकॅडेमीच्या संपूर्ण शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि श्रेयसने त्याला उत्तम अशी अभ्यासपूर्ण जिद्दीची जोड दिली, त्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. आगामी काळात अनेक विद्यार्थी नीट परीक्षेतही चमकतील अशी अपेक्षा आहे..!”
प्राध्यापक राजाराम परब,संचालक,परफेक्ट अकॅडेमी,सिंधुदुर्गनगरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!