आडवली येथे शिवजन्मसोहळयाचे आयोजन

पोईप (संतोष हिवाळेकर) : सनराईज शिवजन्मोत्सव मंडळ आणि शिवप्रेमी आयोजित शिवजन्मसोहळा 2026 (वर्ष – 9 वे) गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 स्थळ : होळीचा माळ, श्री देव रवळनाथ मंदिर नजीक आडवली भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रम सकाळी 9 वाजता आडवली तिठा ते रवळनाथ मंदिर भव्य पालखी मिरवणूक, यामध्ये मुख्य आकर्षण श्री देव गायगोठन ढोल पथक भूतवाडी नारिंग्रे, सकाळी १0 वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर सादरीकरण, सकाळी 10.30 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा महाराजांवर सप्तनध्यांच्या पविञ पाण्याचा जलाभिषेक, विधिवतपूजा, पाळणा गीते, महाआरती सकाळी 11:30 वाजता पुरातन वस्तू शिवकालीन आणि शस्त्रे यांचे प्रदर्शन व उद्घाटन, दुपारी 12:00 वाजता मान्यवरांच्या उपस्थित सत्कार समारंभ, सायंकाळी 7 वाजता महाराजांच्या चरणाशी 396 दिव्यांचा दीपोत्सव व रात्री 8 वाजता महाआरती आणि राञौ ठिक 9 वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा विषय शिवकालीन, संत कालीन, पेशवेकालीन, व्यक्तिरेखा प्रसंग सादरीकरण असे विषय असणार आहेत. यासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क 9403229230, 9322191369.

या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक 5000 व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक 3000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक 2000 सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ 2 बक्षीसे 1000 व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि इतर आकर्षक बक्षिसे सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!