कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश सावंत यांनी सर्वाधिक 5 हजार 193 मतांचे लीड घेऊन विजय मिळवत विक्रम केला आहे. सावंत यांच्या पुढील वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मसुरकर, खजिनदार रविंद्र पावसकर, चर्मकार समाज उन्नती मित्र मंडळ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवलीचे अध्यक्ष आनंद जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका अध्यक्ष महेंद्र चव्हाण तसेच यावेळी संस्थेचे तालुका सचिव मारुती चव्हाण, कार्याध्यक्ष सागर चव्हाण, सुनील जाधव, नारायण पावसकर, सिताराम जाधव यादी मान्यवर समाजबांधव उपस्थित होते.
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले जि. प. सदस्य संदेश सावंत यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार











