14 किलो 114 ग्रॅम वजनाचा गांजा केला जप्त
प्रतिनिधी (कोल्हापूर) : कोल्हापूर, जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील सतीश बांबरे व प्रशांत पांडव 27/04/2023 रोजी योगेश गणेशाचार्य नावाची व्यक्ती फुलेवाडी नाका ते फुलेवाडी सहावा बस स्टॉप दरम्यान गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री सतीशकुमार गुरव यांनी गुन्हे शोध पथकाची पथके तयार करून फुलेवाडी नाका ते फुलेवाडी सहावा बस स्टॉप दरम्यान सापळा लावला असता एक इसम फुलेवाडी नाका येथून फुलेवाडी सहावा बस स्टॉपकडे पाठीवर सॅक लावून जात असल्याचे दिसून आले सापळा पथकाने त्याला पाठलाग करून पकडले योगेश भगवान गणेशाचार्य (वय 29) रा. मुंगशी रोड चंबुखडी शिंगणापूर असे त्याचे नाव असून त्याच्या बॅगेची व त्याची झडती घेतली असता त्यामध्ये 10 किलो 114 किलो वजनाचा, 1,00,000/- रुपये किमतीचा गांजा मिळून आला. त्याच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक करून सदर गुन्ह्यांमध्ये त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने आपण हा गांजा कोल्हापुरातूनच घेतला असल्याचे सांगितले व त्यांची नावे सांगून ते कोल्हापूर मध्येच असल्याचे सांगितले. सापळा पथकाने तात्काळ त्यांची माहिती घेतली असता ते दोघे मंगळवार पेठेतील एका यात्री निवास मध्ये लपले असल्याचे समजले. त्यांचा शोध घेऊन नितीन जगन्नाथ रायते ( वय 42) रा.मु. पो. गुरसाळे ता. माळशिरस जि. सोलापूर व अलोक सुरेंद्र माजी (वय 40)रा. लिटीगुडा संबलपुर जि. गजपती राज्य ओडिसा अशी त्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून 4 किलो गांजा जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यामधील तीनही आरोपींना 02/05/2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशाप्रकारे कोल्हापूर मध्ये गांजा विक्रीसाठी येणाऱ्या तीन इसमांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफिने पकडून त्यांच्याकडून 14 किलो 114 ग्रॅम वजनाचा 1,40.000/- रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI संदीप जाधव व त्यांची टीम करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीसअधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप जाधव, पोलीस अंमलदार सतीश बांबरे, प्रशांत पांडव, परशुराम गुजरे,प्रशांत घोलप, प्रीतम मिठारी, गजानन गुरव, अमर पाटील, संदीप माने,संदीप बेंद्रे, योगेश गोसावी, गौरव शिंदे,उत्तम गुरव यांनी ही कारवाई केलेली आहे.













