अवैध दारू विक्रीत्यांना देवगड पीआय बगळे यांच्यासह एलसीबी चा दणका

देवगड – मिठबांव कोटकामते येथे धाड टाकून १७ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू केली जप्त

देवगड पोलीसांनीही देवगड भाटी येथे गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर केली कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कोटकामते व मिठबांव या दोन गावांमध्ये धाड टाकून सुमारे १७ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.ही कारवाई २९ एप्रिल रोजी दुपारी केली.तर देवगड पोलीसांनी देवगड भाटी येथे २८ एप्रिल रोजी गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमला मिळालेल्या माहितीनूसार २९ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वाजता मिठबांव ओझरम जाणा-या रस्त्यालगत गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी धाड टाकून शैलेश सुनिल लोके(४०) याच्याकडून १०,९०० रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा दारूचा मुद्देमाल हस्तगत केला तर कोटकामते देऊळवाडी या ठ{काणी याच दिवशी दुपारी २.३० वा.सुमारास धाड टाकून अनंत काशीराम घाडी(५२) यांच्याजवळ असलेला ६४०० रूपये किंमतीचा गोवा बनावटीच्या दारूचा मुद्देमाल हस्तगत केला.ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण व{भागाचे पोलीस उपनिरीक्षक आर.बी.शेळके, पो.हवालदार गंगावणे, कदम, पो.कॉ.रविंद्र इंगळे यांनी केली. देवगड पोलीसांनी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ एप्रिल रोजी रात्री ८.१० वा.सुमारास गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी नारायण यशवंत मोहिते(६१) याच्यावर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला.

error: Content is protected !!