चौके मांडखोल शाळेत व शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्टच्या वतीने गावात शिवजयंती उत्साहात साजरी

चौके (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा चौके मांडखोल शाळेत शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मुलांनी शाळेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शालेय परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. सदरच्या ठिकाणी शिवप्रेरणा विविध सेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात सहभाग दर्शवला. यावेळी मुलांनी विविध वेशभूषा केल्या होत्या व शिवाजी महाराजांवर आधारित वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला.

त्यानंतर गीतागायन स्पर्धा पार पडली. विद्यार्थीनींनी सादर केलेला शिवाजी-अफझल खान भेट व वध सर्वांना खूपच आवडला. सदरच्या सर्व स्पर्धेत अनेक नंबर विद्यार्थी मित्रांनी मिळवले. संध्याकाळी सदरच्या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. एकंदरीत सदरचा कार्यक्रम पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या उत्तम सहकार्यामुळे पार पडला. सदरच्या मुलांना शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण व मुख्याध्यापक दिपक गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या या सुंदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

error: Content is protected !!