शुभ्रा राजन नाईकने ‘विशेष प्राविण्य’ मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत पटकावले स्थान
चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ‘गणित प्राविण्य’ परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कुलची इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनी शुभ्रा राजन नाईक हिने ‘विशेष प्राविण्य’ मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. शुभ्रा नाईक ही आता ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेसाठी पात्र ठरली आहे.
शुभ्रा नाईक आणि तीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशाळेचे मुख्याध्यापक देवयानी गावडे, संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, स्कुल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच संस्था पदाधिकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












