एन. एम. एम. एस. परीक्षेत ज्ञानदीप हायस्कूल वायंगणीचे यश

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस्. परीक्षेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी मालवण प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेस बसलेल्या ४ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये किरण नंदकुमार सावंत, अमोल उमेश मालपेकर, आर्या वैभव जोशी हे विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना छाया कुणकवळेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, मुख्याध्यापक टकले, केतकी बांवकर, जाधव, वसावे, संस्था कार्यकारीणी, शिक्षक वर्ग, शाळा कमिटी, पालकवर्ग यांच्यावतीने अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!