रोणापाल माऊलीचा गुरुवारी वर्धापनदिन सोहळा

बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल येथील श्री देवी माऊली देवीचा वर्धापनदिन दिन सोहळा गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त माऊली मंदिरात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. महाप्रसाद गोवा येथील अरुण बिचोलकर-गावडे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला आहे. संध्याकाळी भजन व रात्री ८ वाजता चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!