लोरे नं. 2 ग्रा. पं. ला विभागीय आयुक्तांच्या हस्ते महाआवास अभियान पुरस्कार प्रदान

सरपंच विलास नावले, ग्रा. पं. अधिकारी शिवाजी कस्तुरे यांनी स्वीकारला पुरस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ या ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत सन 2021-22 या वर्षासाठीचा महाआवास अभियान पुरस्कार पटकावला आहे. विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोकण भवन येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच विलास नावळे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी कस्तुरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ग्रामीण विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी पारदर्शक कारभार आणि लाभार्थ्यांना वेळेत घर उपलब्ध करून देण्यात आलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे लोरे नं. २ ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे तालुक्यासह जिल्ह्यात अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!