ओसरगाव नं. 1 शाळेत व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या जीवन विस्तार विभागातर्फे ओसरगाव नं. 1 शाळेत एक तासाची प्रभावी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयाचे मोलाचे कार्य सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा पार पडली. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक किशोर कदम यांनी केले.या कार्यशाळेत प्रणित परब व जय वळंजू हे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी अतिशय सुंदर, रंजक व समजेल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यशाळेचा लाभ घेतला.

यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षक शितल दळवी तसेच उपशिक्षक राजश्री तांबे उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असून शाळेच्या वतीने महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले

error: Content is protected !!