चिंदर पं. स. सदस्य दिपक सुर्वे यांचा ज्ञानदीप हायस्कूल वायंगणीच्या वतीने सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : नुतन चिंदर पंचायत समिती सदस्य तथा वायंगणी ज्ञानदीप संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिपक भागोजी सुर्वे यांचा वायंगणी हायस्कूलच्या वतीने आज शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार संस्थेचे चंद्रकांत उर्फ बाबू हडकर यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दिपक सुर्वे म्हणाले की, शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम, सक्षम आणि जबाबदार पिढी घडविण्याचे काम ज्ञानदीप माध्यमिक शाळेतील शिक्षक करत आहेत, नुकत्याच झालेल्या एन. एम.एम.एस परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले हे कौतुकास्पद आहे. आपण केलेला घरचा सत्कार हि माझ्यासाठी अभिमान आणि प्रेरणेनेची बाब आहे. शाळेसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सुर्वे म्हणाले,

यावेळी संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, कार्यवाह वैभव जोशी, संचालक ॲड. समृध्दी आसोलकर, मुख्याध्यापक दगडूपंत टकले, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, आचरा पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, शिक्षक केतकी बांवकर, वसावे, छाया कुणकवळेकर, बाळू वस्तू, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार शिक्षक संजय जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!