मालवण (प्रतिनिधी) : मालवण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गटनेते पदी दीपक सुर्वे यांची तर उपगटनेते पदी योजना जयराम कांबळी यांची निवड करण्यात आली आहे या गटात दीपक भागोजी सुर्वे (चिंदर पं. स.), सीमा सतीश परुळेकर (आडवली मालडी पं. स.), माधुरी मोहन मसुरकर (वराड पं.स.), घनःश्याम चंद्रकांत झाड ( वायरी भूतनाथ पं. स.), संतोष दत्तात्रय गावडे (सुकळवाड पं. स.), योजना जयराम कांबळी (कोळंब पं.स.) यांचा समावेश आहे.
मालवण पं. स. गटनेतेपदी दीपक सुर्वे, उपगटनेतेपदी योजना कांबळी












