मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत केतकी वायंगणकर, स्वरा मोहिते प्रथम

स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून केतकी शरद वायंगणकर आणि लहान गटातून स्वरा हणमंत मोहिते यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्हीही गटात एकूण 28 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक उदय दुदवडकर, निनाद दाणी, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, तळेरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, धनलक्ष्मी तळेकर, संभाजी ताम्हणकर, डॉ. अभिजीत कणसे, वैभव पारधिये, राजेश जाधव, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, श्रावणी मदभावे, रेश्मा तळेकर, ध्रुव बांदिवडेकर, अजित गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 9 वी अशा दोन गटात आयोजित करण्यात आली होती. यातील पहिल्या गटाला माझी मायबोली मराठी आणि दुसऱ्या गटाला मराठी भाषेच्या देशव्यापी प्रसारणाची आवश्यकता असे विषय देण्यात आले होते. ही स्पर्धा तळेरे येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे पार पडली.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट (अनुक्रमे प्रथम तीन) : स्वरा हणमंत मोहिते (प्रथम – कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे), दीपलक्ष्मी कनक भांबुरे (व्दितीय – वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे), समर्थ गोविंद सुतार (तृतीय – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, साळीस्ते नं.1), धनिष्का मिनेश तळेकर (उत्तेजनार्थ – वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे), सिया समीर ताम्हणकर (उत्तेजनार्थ – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, साळीस्ते नं.1)

मोठा गट (अनुक्रमे प्रथम तीन) : केतकी शरद वायंगणकर (प्रथम – वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे), आकांक्षा वसंत आडिवरेकर (व्दितीय – कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे), भक्ती महेश लाड (तृतीय – कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे), पूजा महेंद्र केसरकर (उत्तेजनार्थ – वारगाव माध्यमिक विद्यालय), धैर्या अरविंद परब (उत्तेजनार्थ – कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे)

या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परीक्षक उदय दुदवडकर, वैभव पारधिये यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाचनालयाच्या ग्रंथपाल साक्षी तळेकर, नेत्रा पावसकर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेचे निवेदन आणि आभार निकेत पावसकर यांनी मानले.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!