“मालवणी करंडक” महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. कै.दिनकर धारणकर यांच्या नंतर नाट्य कलेत पडलेला खंड मालवणी करंडकच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला याचा मला अभिमान आहे. समितीच्या पदाधिकार्यांनी यात सातत्य ठेवावे, जेणे करुन दरवर्षी पुण्या, मुंबईचे स्पर्धक या ठिकाणी येतील. मालवणी भाषेत गोडी आहे. त्यामुळे ती सर्वांना आपलेसे करते, असे मत माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी मांडले. दरम्यान “मालवणी करंडक महोत्सव” घेण्यासाठी पुढाकार घेणार्या अमोल टेंंबकर आणि रुजूल पाटणकर यांच्यासह त्यांच्या टिमचे करावे तितके कौतूक थोडेच आहे, असे सांगून मालवणीसाठी सुरू असलेली त्यांची धडपड कौतूकास्पद आहे, असे ही ते म्हणाले. ओंकार कलामंच, सावंतवाडी आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “मालवणी करंडक महोत्सवा”ला आमदार दिपक केसरकर यांनी भेट दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा महोत्सव समितीचे अध्यक्ष बबन सागावकर यांच्या हस्ते केसरकर यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी करंडक सभेचे अध्यक्ष अमोल टेंबकर उपाध्यक्ष रूजूल पाटणकर परीक्षक सतीश पाटणकर उद्योजक चेतन नेवगी यावेळी जेष्ठ रंगकर्मी कै. आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ उद्योजक चेतन नेवगी यांनी पुरस्कुत केलेला पुरस्कार कुडाळ येथील नाट्य कलाकार अंकुश कुभांर आणि जेष्ठ रंगकर्मी कै. दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन धारणकर यांनी पुरस्कुत केेलेला पुरस्कार वेंगुर्ले-आसोली येथील दशावतार कलाकार आनंद नार्वेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार केसरकर पुढे म्हणाले, अमोल टेंबकर आणि रुजूल पाटणकर यांच्यासह त्यांच्या टिमच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे. श्री. टेंबकर हे कायम नृत्य, नाट्य क्षेत्रात काही ना काही तरी करीत असतात. त्यांना पाठिंबा देण्याचे काम पाटणकर ट्रस्टचे संचालक रुजूल पाटणकर यांनी केले. हे कौतुकास्पद आहे. बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चांगला झाला आहे, असे सांगुन त्यांनी सर्व टिमचे अभिनंदन केले तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाचे कौतुक केले. कलेसाठी धडपडणार्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा गौरव केला.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्यावेळी दिनकर धारणकर यांनी शहरात नाट्य चळवळ सुरू केली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर यात खंड पडला. मात्र मालवणी करंडक महोत्सवाच्या निमित्ताने त्याची पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. मात्र यात समितीने सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. मालवणी भाषा रुजावी, बोलली जावी, यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. या स्पर्धेत सातत्य राहील्यास पुणे, मुंबई येथील एकांकिका या ठिकाणी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेेळी श्री. साळगावकर, टेंबकर व पाटणकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ओंकार डान्स अॅकेडमीच्या पुजा पारधी, विश्व डान्स अॅकेडमीचे तुळशीदास आर्लेकर, जानू डान्स अॅकेडमीच्या जान्हवी सारंग, स्वराज्य अॅकेडमीचे हर्ष जाधव, माजी नगरसेवक गोविंद वाडकर, परिक्षक कुणाल मसाले, कृृष्णा सावळ, सतिश पाटणकर, सानिका पडवळकर, वैभव केंकरे, प्रशांत मोरजकर आदींचा सन्मान करण्यात आला. यावेेळी सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सावली पाटकर, प्रशांत सावंत, हेमंत पागंम, आर्या टेंबकर, ओम टेंबकर, आराध्या मोरजकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिध्देश नेरुरकर, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, अंकिता काष्टे, शंशाक काष्टे आदी उपस्थित होते.












