चौके (प्रतिनिधी) : ग्लोबल फाउंडेशन,पिंगुळी संस्थेतर्फे भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके तालुका मालवण विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना “ज्ञानज्योती शिष्यवृत्ती” रक्कम त्यांच्या खात्यावर प्रदान करण्यात आली. ग्लोबल फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी ग्रामीण भागातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती अंतर्गत रक्कम प्रदान करण्यात येते. विद्यालयातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा शैक्षणिक प्रगती मध्ये फायदा झाला आहे.
यावर्षी विद्यालयातील कु कुशल विशाल गावडे, कु पल्लवी प्रमोद सामंत, कु भाग्यश्री सखाराम चव्हाण, कु नम्रता चव्हाण, कु चरण दशरथ जाधव या विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.
संस्था स्थानिक समिति अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे मनस्वी आभार मानले.












