कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन निमित्त वरवडे ग्रामपंचायत च्या वतीने रविवार 8 मार्च रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रामपंचायत व पॅरा दीप फॉस्फेट लि, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गावा गावात ज्या महिला भाजीपाला पिकवतात व तो कणकवली बाजारपेठेत तसेच गावात विकतात व त्यावर आपला उदरनिर्वाह करतात अशा एवढा दहा महिलांचा प्रोत्साहन पर सत्कार समारंभ करण्यात आला तसेच महिलांचे आहे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले व हळदीकुंकू समारंभाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला वरवडे गावच्या सरपंच करुणा घाडीगावकर, ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी चव्हाण, महिला सदस्य, कृषी सहाय्यक अधिकारी ग्राम संघाचे पदाधिकारी सीआरपी तसेच अंगणवाडी सेविका आशा सेविका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका व गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.













