चौके (प्रतिनिधी) : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी, कुडाळ या संस्थेच्या वतीने सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य (सं). कनिष्ठ. महाविद्यालय वराडच्या चार विद्यार्थिनींना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रशालेतील कु. दीक्षा प्रभाकर वराडकर, कु. पायल फुलाराम देवासी, कु. निधी सूर्यकांत चव्हाण, कु. जान्हवी संतोष नांदोसकर या चार विद्यार्थिनींना ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी, कुडाळ या संस्थेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यामध्ये 3600 रुपये शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यात आली. ग्लोबल फाउंडेशनच्या या सहकार्याबद्दल वराड ग्रामस्थ संघ मुंबईचे अध्यक्ष अरुण गावडे, सचिव प्रदीप म्हाडगुत , सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन देवेन ढोलम, सदस्य विनोद आळवे, वसंत वराडकर, प्रदीप मिठबावकर मुख्याध्यापिका श्रीम. मयेकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे आभार मानण्यात आले.
वराड हायस्कुलच्या चार विद्यार्थिनींना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान











