स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त रक्तदान शिबिर

स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त शुक्रवार 20 मार्च रोजी स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 20 मार्च रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे कानडेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.इच्छुक रक्तदात्यांनी डामरे सरपंच किरण कानडे मोबा. 9420725411 साईनाथ सावंत मोबा. 9420112802, विनायक पारधीये मोबा. 9420741609 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!